नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रस्त्याने पायी जात असतांना चक्कर येवून पडल्याने ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना दिंडोरीरोडवरील मार्केट यार्ड भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
योगेश साहेबराव सुर्यवंशी (रा.नवे निरपूर ता. सटाणा) असे मृत युवकाचे नाव आहे. सुर्यवंशी कामानिमित्त शहरात आले होते. २६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास ते दिंडोरीरोडवरील मार्केट यार्ड भागातून रस्त्याने पायी जात असतांना अचानक चक्कर येवून जमिनीवर कोसळले होते.
या घटनेत त्यांच्या डोक्यास दुखापत झाल्याने भाऊ सागर सुर्यवंशी यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता मंगळवारी (दि.१) उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार कुलकर्णी करीत आहेत.