नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रविवार कारंजा भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ८७ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र बापुराव कुलकर्णी (रा.एकमुखी दत्त मंदिराजवळ,उमामाहेश्वर वाडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कुलकर्णी कुटुंबिय दोन दिवस पुणे येथे गेले असता ही घटना घडली. शनिवारी (दि.२९) रात्री अज्ञात चोरट्यांनी कुलकर्णी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ही चोरी केली.
घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली ५२ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ८७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.