नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धुणी भांडी करण्यासाठी घरात येणा-या मोलकरणीने महिलेची पोत चोरून नेली. ही घटना जाखडीनगर भागात घडली. या घटनेत ८५ हजार रूपये किमतीच्या शॉट पोतवर भामट्या महिलेने डल्ला मारला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पुजा संघपाल कांबळे (रा.राजीवनगर झोपडपट्टी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याबाबत दिप्ती देविदास चिनावले यांनी फिर्याद दिली आहे. चिनावले यांच्याकडे कांबळे ही महिला कामास असून धुणीभांडी व साफसफाईचे ती काम करते.
दि.१६ फेब्रुवारी रोजी तिने घरातील कुणाचे लक्ष नसल्याची संधी साधत चिनावले यांची सुमारे ८५ हजार रूपये किमतीची शॉट पोत चोरून नेली. अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.









