नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एसटी महामंडळाच्या कार्गो सेवेत नेमणुकीस असलेल्या वाहकाने साडे तीस लाखाच्या रकमेचा अपहार केला. कंपनी मालवाहतूक भाड्याची रक्कम आगारात न भरता संशयिताने परस्पर हडप केल्याचे ठपका ठेवण्यात आला असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक रघुनाथ मोरे (रा.गणेश चौक,सिन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित वाहकाचे नाव आहे. याबाबत एस.टी महामंडळाचे दादाजी महाजन (रा.कामठवाडे) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित मोरे १ एप्रिल २०२३ ते २६ मार्च २०२५ दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या कोर्गो सेवेत कार्यरत असतांना हा अपहार झाला. संशयिताने ज्या कंपनीच्या मालाची वाहतूक केली.
त्या वाहतुकीच्या भाड्याची रक्कम एस.टी महामंडळाच्या आगार कार्यालयात जमा करणे बंधनकारक असता संशयिताने या काळात वेगवेगळया कंपनीच्या मालवाहकूची तब्बल ३० लाख ६७ हजार ३५० रूपयांचा परस्पर अपहार केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.