नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कौटूंबिक वादातून पतीनेच आपल्या घरातील रोकडसह अलंकार व महत्वाचे कागदपत्र असा सुमारे अडिच लाखाचा ऐवज चोरून नेला. ही घटना साधुवासवानीरोडवरील होलाराम कॉलनीत घडली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार निरंज नारंग असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. याबाबत पत्नी सदबीर नारंग यानी फिर्याद दिली आहे. नारंग दांम्पत्यात कौटूंबिक वाद झाला होता.
या वादातून संशयित पतीने गुरूवारी (दि.२७) सकाळच्या सुमारास कपाटात ठेवलेली दोन लाख रूपयांची रोकड,डायमंडचे ब्रॅसलेट, सो्न्याची अंगठी याबरोबरच जॅग्वर आणि होंडासिटी कारचे कागदपत्र आणि मुलांचे आणि पत्नीचे महत्वाचे कागदपत्र तसेच बँकाचेर्पासबुक एटीएम,क्रेडिट कार्ड चोरून नेल्याची तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
………..