नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिरोड भागात पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी वृध्दाच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या लांबविल्याचा प्रकार घडला. या घटनेत मदतीचा बहाणा करून भामट्यांनी सुमारे ४८ हजार रूपये किमतीचे दागिणे पळविले असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगाधर कनोजी घुगे (८५ रा. पुजा दर्शन सोसा.आनंदनगर,जगतापमळा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. घुगे गुरूवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास मुक्तीधाम भागात फेरफटका मारण्यासाठी गेले असता ही घटना घडली. महापालिकेच्या शाळा क्र १२५ पाठीमागून ते नेहमीप्रमाणे चक्कर मारून मुठाळ हॉस्पिटल बिल्डींगखाली बसले असता दोन अनोळखी इसमांना त्यांना गाठले.
पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी हातातील अंगठ्या सुरक्षीत ठेवण्याचा सल्ला देत मदतीच्या बहाण्याने सुमारे ४८ हजार रूपये किमतीच्या दोन अंगठ्या हातोहात लाबंविल्या. अधिक तपास हवालदार घेगडमल करीत आहेत.
…….
हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणा-या दोघांना पोलीसानी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणा-या दोघांना पोलीसानी बेड्या ठोकल्या. औद्योगीक वसाहतीतील वेगवेगळय़ा भागात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार करण तुकाराम शिंगाडे (२१ रा.संतोषी मातानगर,एमआयडीसी सातपूर) व राहूल मारूती इंगळे (३३ रा.महाराष्ट्र हौ.सोसा.सातपूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शिंगाडे व इंगळे यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमिवर शहर पोलीसांनी दोघांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून दोघांना तडिपार करण्यात आलेले असतांना त्यांचा वावर शहरात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
पोलीस त्यांच्या मागावर असतांनाच गुरूवारी (दि.२६) शिंगाडे कामगारनगर येथील कौशल्या पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या गंमत जंमत हॉटेल परिसरात तर इंगळे सातपूर कॉलनीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्के भागात मिळून आला. याप्रकरणी अनुक्रमे सातपूरचे अंमलदार सागर गुंजाळ व शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ चे हवालदार सुनिल आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार अनिल आहेर व जमादार आबाजी मुसळे करीत आहेत.
….