नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- परिसरात दहशत माजविण्यासाठी धारदार तलवारी बाळगणा-या तरूणास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून दोन लोखंडी तलवारी हस्तगत करण्यात आल्या असून त्यास मुद्देमालासह म्हसरूळ पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने केली.
किरण हरिशचंद्र शिंदे (३१ रा.शिंदे गल्ली,संभाजी चौक म्हसरूळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शिंदे हा परिसरात दहशत माजवित असून त्याच्याकडे दोन तलवारी असल्याची माहिती युनिटचे कर्मचारी योगीराज गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२५) पथकाने सापळा लावून संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहे. याबाबत हवालदार देविदास ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खराटे करीत आहेत.
५५ वर्षीय महिलेची आत्महत्या
नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतनगर भागात राहणा-या ५५ वर्षीय महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सलमा रहेमान शेख (रा.गल्ली नं.१ गरीब नवाज बेकरी जवळ) असे मृत महिलेचे नाव आहे. शेख यांनी सोमवारी (दि.२४) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना नारायणी हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता मंगळवारी डॉ. कार्तिकी भोसले यांनी तिला तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार भोये करीत आहेत.