नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पोलीसात तक्रार दिल्याच्या रागातून दोघांनी दाम्पत्यास शिवीगाळ करीत घरावर दगडफेक केल्याची घटना मखमलाबाद येथील शांतीनगर भागात घडली. या घटनेत मालवाहू पिकअप वाहनाच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादू खटक्या व शंभू रायकर (रा.दोघे शांतीनगर,मखमलाबाद) अशी दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत. याबाबत मिना रामदास नाईक (रा.शांतीनगर) या महिलेने फिर्याद दिली आहे. नाईक दांम्पत्य व संशयितांमध्ये मंगळवारी (दि.२५) दुपारी वाद झाला होता. याबाबत नाईक दांम्पत्याने पोलीसात तक्रार दिली. या रागातून संशयितांनी संध्याकाळी दांम्पत्याचे घर गाठत त्यांना शिवीगाळ करीत घरावर दगडफेक केली.
या घटनेत नाईक यांच्या मालकिच्या पिकअप एमएच १५ जेसी ०५४१ वाहनाच्या काचा फोडून संशयितांनी नुकसान केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले असून अधिक तपास हवालदार संजय गवारे करीत आहेत.