नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पार्क केलेला मालट्रक चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना आडगाव ट्रक टर्मिनल येथे घडली. या घटनेत दहा लाख रूपये किमतीचा अशोक लेलंड ट्रक चोरट्यांनी चोरून नेला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अझहर सादिक शेख (रा.नानावली दर्गा, जुने नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख यांचा केए ३६ सी ७८७९ हा मालट्रक आडगाव येथील ट्रक टर्मिनल परिसरातील मनपाच्या ग्राऊंडमध्ये पार्क केलेला असतांना तो चोरट्यांनी पळवून नेला.
ही घटना गेल्या २५ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. सर्वत्र शोध घेवूनही मालट्रक हाती न लागल्याने शेख यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत.