नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीस वाहनास दुचाकीने धडक दिल्याची घटना नाशिक पुणे मार्गावरील उपनगर नाका सिग्नल भागात घडली. या घटनेत दुचाकीवर ट्रिपलसिट प्रवास करणारे तीन तरूण जखमी झाले असून पोलीस वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर्शन हांडगे, गणेश ठाकुर व अमोल जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जखमी दुचाकीस्वारांची नावे आहेत. याबाबत अंमलदार भुषण अनवट यांनी फिर्या द दिली आहे अनवट रविवारी (दि.२३) सायंकाळी उपनगर पोलीस ठाण्याच्या सिआर मोबाईल एमएच १५ जे एस ४४३० या वाहनावर सेवा बजावत असतांना हा अपघात झाला. हद्दीतील सुरक्षीत नाशिक अॅपनुसार पॉईंट भेटी व पेट्रोलींग करून ते उपनगर पोलीस ठाण्याच्या दिशेने ते प्रवास करीत होते.
उपनगर नाका सिग्नल येथे सिग्नल सुटल्यानंतर पोलीस वाहन वळण घेत असतांना द्वारकेकडून भरधाव ट्रिपलसीट सिग्नल तोडून येणारी दुचाकी पोलीस वाहनावर आदळली. पोलीस वाहनावरील चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला असून या अपघातात दुचाकीवर प्रवास करणारे युवक जखमी झाले आहेत तसेच पोलीस वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.