नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्त्याने पायी जाणा-या युवतीची वाट अडवित एकाने विनयभंग केल्याची घटना शालिमार भागात घडली. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असून संशयिताने शिवीगाळ करीत दमदाटी केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोईन खान (२६ रा. शालीमार) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. परिसरात राहणारी युवती गुरूवारी (दि.२०) सकाळच्या सुमारस नजीकच्या सार्वजनिक शौचालयाच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. संशयिताने पाठलाग करीत तिची वाट अडविली.
यावेळी तरूणीचा हात पकडून त्याने प्रेमाची व मोबाईल नंबरची मागणी करीत तिचा विनयभंग केला. यावेळी तरूणीने प्रतिकार करताच संशयिताने तिला शिवीगाळ करीत दमदाटी केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.