नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात महिला मुलींवर अत्याचार वाढले आहे. अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत्यानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, नराधम चुलत्यास अटक करण्यात आली आहे.
श्रमनगर येथील पगारे मळा भागात राहणा-या अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत चुलत्याने वेळोवेळी बलात्कार केला. याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली असून घरात कुणी नसल्याची संधी साधत चुलत दिराने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, नराधम चुलत्यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.