नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पती समवेत रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्याने ओरबाडून नेले. ही घटना म्हसरूळ परिसरात घडली. याप्रकरणी पोलीस दप्तरी जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमल चंद्रशेखर क्षेमकल्याणी (६० रा. गुलमोहर नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. क्षेमकल्याणी दांम्पत्य शुक्रवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास नेहमी प्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली.
परिसरातील संजोग बिल्डींग समोरून दांम्पत्य जात असतांना समोरून आलेल्या दुचाकीस्वाराने विमल क्षेमकल्याणी यांच्या गळय़ातील सुमारे २५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक दिपक पटारे करीत आहेत.