नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतील चार लाख रूपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सिक्स सिग्मा हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक बन्नालाल पारिक (रा.अंबड पोलीस स्टेशन जवळ,सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पारिक बुधवारी (दि.४) दुपारी आजारी नातेवाईकास
भेटण्यासाठी सिक्स सिग्मा हॉस्पिटल येथे गेले होते. पेशंटला सोडण्यात येणार असल्याने ते सोबत पैसे घेवून गेले होते. एमएच १५ डीएम ५५९५ या मोपेड दुचाकीच्या डिक्कीत पैसे ठेवून ते हॉस्पिटलमध्ये गेले असता ही घटना घडली.
पेशंटला सोडण्यास उशी लागणार असल्याने त्यांनी रोकड डिक्कीतच ठेवून आपली मोटारसायकल हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावली असता ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीची डिक्की उघडून चार लाखाची रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.
तीस हजार रूपयाला गंडा
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोट फार्म टाकण्यासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्याने एकास तीस हजार रूपयांना गंडविले आहे. वर्ष उलटूनही कुठल्याही हालचाली न झाल्याने तक्रारदाराने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन खंडू पगारे (रा.विजय ममता थिअटर समोर,शिवाजीनगर) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत गणेश वामन कंकाळ (रा.पाथर्डीगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ककाळ यांची पाथर्डी शिवारात शेतजमिन आहे. या शेतीस जोडधंदा म्हणून त्यांना गोट फॉर्म व्यवसाय करायचा होता. त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी संशयिताची भेट घेतली होती. या भेटीत शेळी पालन प्रशिक्षण सर्टफिकेट मिळवून देत शासकिय सबसिडीतील कर्ज मिळवून देण्याची ग्वाही संशयिताने दिली होती. यापोटी ३० हजार रूपयांची रक्कम संशयिताला अदा करण्यात आली. मात्र वर्ष उलटूनही संशयिताने कुठल्याही हालचाली न केल्याने कंकाळ यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.