नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फारकत होवूनही पाठलाग करीत आलेल्या पूर्वाश्रमिच्या पतीने महिलेस मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना कानडे मारूती लेन भागात घडली. या घटनेत संशयिताने महिलेच्या भाचीस ढकलून देत हे कृत्य केले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतिश परदेशी (रा. तपोवनरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. जुने नाशिक भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडिता व संशयित पती पत्नी होते. मात्र त्यांच्यात गेल्या पाच वर्षापूर्वी फारकत झाली आहे. दोन्ही सध्या विभक्त राहत असतांना संशयिताने तिचा पाठलाग करीत विनयभंग केला. पीडिता गुरूवारी (दि.१३) आपल्या बहिणीच्या मुलीस सोबत घेवून फळ खरेदीसाठी कानडे मारूती लेन भागात गेली होती.
संशयिताने तिचा पाठलाग केला. यावेळी संशयिताने तिला गाठून शिवीगाळ व मारहाण करीत तिचा विनयभंग केला. यावेळी महिलेची भाचीने हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिलाही मारहाण करीत ढकलून दिले अधिक तपास उपनिरीक्षक दहिफळे करीत आहेत.