नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोटच्या अल्पवयीन मुलीवर बापानेच वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. बापलेकीच्या पवित्र नात्यास काळीमा फासणा-या या घटनेत मुलीस बेदम मारहाण करण्यात आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून पोलीसांनी संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटीतील ११ वर्षीय पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या महिन्यात बापलेक घरात एकटे असतांना मध्यरात्री संशयिताने आपल्या मुलीवर बळजबरीने बलात्कार केला. यावेळी धमकवल्याने मुलीने नराधाम अत्याचार सहन केला. मात्र पुन्हा २ मार्च रोजी घरात कुणी नसल्याची संधी साधत नराधम बापाने आपले इस्पीत साध्य केले.
वारंवार वडिलाकडून होणारा अत्याचार सहन न झाल्याने पीडितेने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने मुलीस बेदम मारहाण केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला.मुलीची तक्रार प्राप्त होताच पोलीसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.