नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी सोमवारी (दि.१०) आत्महत्या केली. त्यातील युवकाने विषारी औषध सेवन करून तर सिडकोतील महिलेने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी भद्रकाली व अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संदिप सुरेश लहानगे (१८ रा. भिमवाडी,गंजमाळ) या युवकाने गेल्या शनिवारी (दि.८) रात्री अज्ञात कारणातून आपल्या घर परिसरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच त्यास कुटुंबियानी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता सोमवारी उपचार सुरू असतांना डॉ. रविना गवाल यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोतील कामटवाडा भागात घडली. सविता सुनिल सुळे (४१ रा. ऋतुजा अपा.उमा हॉस्पिटल मागे) या महिलेने सोमवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या हुकास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.
दोन तडिपारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात तडिपारांचा वावर वाढला आहे. कारवाई करूनही नाकावर टिच्चून शहरात वावर ठेवणा-या दोन तडिपारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात करण्यात आली असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुरपित उर्फ गोपी बलदेव देवल (२७) व रवी गजानन गवई (२४ रा. दोघे घरकुल योजना चुंचाळे अंबड) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयित तडिपार गुंडाची नावे आहेत. संशयितांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. शहर व जिह्यातून दोघांना वेगवेगळया कालावधीसाठी हद्दपार केलेले असतांनाही ते शहरात मिळून आले.
देवल व गवई सोमवारी (दि.१०) दुपारच्या सुमारा घरकुल योजनेतील बिल्डींग नंबर २२ व २३ समोर मिळून आले. याबाबत शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ चे हवालदार चंद्रकांत गवळी व एमआयडीसी चौकीचे अंमलदार किरण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास हवालदार पठाण करीत आहेत.
……..