नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरीरोडवरील दोन ठिकाणी झालेल्या चोरीमंध्ये भामट्यांनी सुमारे ९० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केतन विलास डोईफोडे (रा.गुलमोहर नगर दिंडोरीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. डोईफोडे कुटुंबिय रविवारी (दि.९) सकाळी आपआपल्या कामात व्यस्त असताना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने उघड्या घरात शिरून टेबलवर ठेवलेला मोबाईल, टॅब आणि पाकिट असा ऐवज चोरून नेला. पाकिटात सात हजाराच्या रोकडसह महत्वाचे कागदपत्र होती. या चोरीत बामट्यांनी सुमारे ४३ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला असून असाच प्रकार शनिवारी (दि.८) गजपंथ भागात घडला. याबाबत वैभवी नितीन झोमने (रा.अमृतसरिता अपा.शिवाजीनगर,गंजपथ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. झोमने यांच्या घरात शिरून चोरट्यांनी सुमारे ४६ हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. याबाबत एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बाराईत करीत आहेत.