नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरात शिरून शेजा-याने दांम्पत्यास धमकावित महिलेचा विनयभंग केला. ही घटना रोकडोबावाडी भागात घडली. पती पत्नीतील वाद सुरू असतांना बेकायदा प्रवेश करीत संशयिताने हे कृत्य केले असून त्यास पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय बाबुराव क-हाळे (३९) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीत महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित व पीडिता एकमेकांचे शेजारी राहतात. शनिवारी (दि.८) रात्री पीडिता व तिच्या पतीमध्ये आपल्या घरात कौटूबिंक कारणातून वाद सुरू होता. यावेळी संशयिताने बेकायदा प्रवेश करीत हे कृत्य केले.
तुमच्या भांडणाचा आम्हाला त्रास होतो असे म्हणत संशयिताने शिवीगाळ करीत दाम्पत्यास धक्काबुक्की केली. यावेळी त्याने महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास पोलीस नाईक होलगीर करीत आहेत.
……….
तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या.
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पाथर्डी शिवारातील दामोदर नगर भागात २५ वर्षीय तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. पोलीसानी हद्दपारीची कारवाई केलेली असतांना तो विनापरवानगी वावरतांना मिळून आला. ही कारवाई शहर गु्न्हे शाखेच्या युनिट २ पथकाने केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश तुळशीराम लिपणे (रा.दामोदर नगर पाथर्डी फाटा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. लिपणे यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीस रोखण्यासाठी त्याच्या विरूध्द शहर पोलीसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून त्यास दोन वर्षासाठी हद्दपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मगावर असतांंना तो रविवारी (दि.९) दुपारी यशवंतनगर येथील गणेश गार्डन भागात मिळून आला. याबाबत जमादार सुहास क्षिरसागर यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
………….