नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टाकळीरोडवरील शंकरनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे आठ लाख रूपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात साडे तीन लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनिषा निलेश लुणावत (रा.शंकरनगर टाकळीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लुणावत कुटूंबिय गेल्या बुधवारी (दि.५) दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या तीसºया मजल्यावरील टेरेसचा दरवाजा तोडून ही चोरी केली. घरात शिरलेलया भामट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ८ लाख पाच हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक ताडे करीत आहेत.