नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कार पार्किंगमध्ये व्यवस्थीत लावण्याचा बहाणा करून भामट्यांनी लॅपटॉपसह रोकड हातोहात लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. हॉटेल कोर्ट यार्ड येथे हा प्रकार घडला असून यात सुमारे ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर जिह्यातील मयुर कैलास नवले (रा.नवलेवाडी ता.अकोले हल्ली अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल समोर नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नवले व त्यांचे मित्र सुरज पुंड हे मंगळवारी (दि.४) रात्री हॉटेल कोर्ट यार्ड येथे गेले होते. प्रवेशद्वारावरच हॉटेल कर्मचाºयांनी दोघांच्या एमएच १७ एझेड १०४२ व एमएच १४ केक्यू १४४२ या कारचा ताबा घेतला. हॉटेल पार्किंगमध्ये वाहने लावत असल्याचा बहाणा करून भामट्यांनी एका कारमधून अॅपलचा लॅपटॉप व दुसºया कारमधील सुारे २५ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.
……..
बसमध्ये चढतांना प्रवाश्याच्या गळय़ातील सोनसाखळी चोरट्यांनी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बसमध्ये चढतांना प्रवाश्याच्या गळय़ातील सोनसाखळी भामट्यांनी हातोहात लांबविली. ही घटना मेळा बसस्थानक परिसरात घडली. या घटनेत सव्वा लाख रूपये किमतीचा गोफवर चोरट्यानी डल्ला मारला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद सुखदेव हिरे (रा.गजानननगर,अंबड वजन काट्याजवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हिरे शुक्रवारी (दि.७) सकाळी मालेगाव येथे जाण्यासाठी मेला बसस्थानकात आले होते. शहापूर रावेर या बसमध्ये चढत असतांना ही चोरी झाली. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ््यातील चार तोळे वजनाची व एक लाख २८ हजार ५२९ रूपये किमतीची सोनसाखळी हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.