नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चालकास मारहाण करीत दोघा अनोळखींनी एसटी बसची काच फोडल्याची घटना महामार्गावरील बळी मंदिर भागात घडली. ट्राफीक जाम असतांना बस आडवी घातल्याने ही घटना घडली असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात शासकिय संपत्तीचे नुकसान व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरविंद शांताराम पाबळे (४२ रा.मालेगाव) यानी याबाबत फिर्याद दिली आहे. पाबळे मालेगाव आगारात चालक पदावर कार्यरत असून ते शुक्रवारी (दि.७) सकाळी मालेगाव नाशिक या बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. सकाळी दहाच्या सुमारास एमएच २० जीसी २७६९ मध्ये प्रवासी भरूण ते नाशिकच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा प्रकार घडला. महामार्गावर ट्राफिक जाम असल्याने त्यांनी आपल्या ताब्यातील वाहन बळी मंदिरासमोरील सव्हीसरोडने दामटले असता हा वाद झाला.
पेशवा हॉटेल चौफुली भागात बस उड्डाणपूलाखील अचानक मुख्य रस्त्यावर आल्याने पाठीमागून शिवीगाळ करीत आलेल्या दोघानी बसचालक पाबळे यांना जाब विचारला. याघटनेत संपप्त दोघांनी शिवीगाळ करीत पाबळे यांना मारहाण केली. यावेळी एकाने दगड फेकून मारल्याने बसची काच फुटली असून अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.