नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सुरक्षा रक्षक असलेल्या महिलेचा सोसायटीच्या चेअरमनने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. टेरेसला लावण्यासाठी कुलूप देण्याचा बहाणा करून घरात बोलावून या विनयभंग केला आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण बागुल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित सोसायटी चेअरमनचे नाव आहे. पीडिता संशयित चेअरमन असलेल्या सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून कामास आहे. मंगळवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास संशयिताने पीडितेस फोनवर संपर्क साधून आपल्या घरात बोलाविले होते. सोसायटीच्या मिटींगमध्ये झालेली चर्चेनुसार टेरेसला कुलूप लावण्याचे ठरले असून कुलूप घेवून जा असे सांगतल्याने महिला त्याच्या घरी गेली असता ही घटना घडली.
घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयिताने कुलूप देण्याचा बहाणा करून पीडित महिलेस बेडरूममध्ये घेवून जात तिचा विनयभंग केला. पीडितेने कशीबशी सुटका करून पोलीस ठाण्यात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार गणेश हिंडे करीत आहेत.