नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पेठरोडवरील मेघराज बेकरी परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पाच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात २० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय संजय गवळी (रा.भगवानबाबा नगर,मेघराज बेकरी पेठरोड) यानी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गवळी कुटूंबिय १ ते ४ मार्च दरम्यान कोलकत्ता येथे विवाह सोहळयानिमित्त गेले असता ही घरफोडी झाली.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून पहिल्या व दुस-या माळयावरील बेडरूमध्ये असलेल्या कपाटातील रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४ लाख ९० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.