नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोदाघाटावरील रामकुड भागात टोळक्याने एकावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवरात्रीच्या दिवशी झालेल्या किरकोळ वादातून हा हल्ला झाला असून यात २६ वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकी केदार, चिकू केदार,प्रशांत डोईफोडे व राहूल (पूर्ण नाव पत्ता नाही) अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहे. याप्रकरणी विवेक विद्याचल मौर्य (रा.पंचवटी कारंजा) या तरूणाने फिर्याद दिली आहे. मौर्य सोमवारी (दि.३) रात्री गोदाघाटावरून निघणा-या कपालेश्वर महाकाल पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी परिसरात गेला असता ही घटना घडली.
महाशिवरात्रीच्या दिवशी संशयितांशी त्याचा वाद झाला होता. त्यामुळे त्यांनी रामकुंड भागात गाठून मौर्य यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यानी मारहाण केली. याप्रसंगी संतप्त केदार याने कमरेला लावलेला धारदार चाकू काढून जीवे ठार मारण्याची धमकी देत मौर्य याच्यावर हल्ला केला. या घटनेत मौर्य गंभीर जखमी झाला असून अधिक तपास हवालदार माळवाळ करीत आहेत.