नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुने नाशिक परिसरात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात दोन लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलमान सुलतान खान पठाण (३५ रा. दानी चौक,चौक मंडई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पठाण कुटुंबिय सोमवारी (दि.३) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली.
अज्ञात चोरट्यानी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ४७ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अदिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
.
चोरट्यांनी लोखंडी प्रोपजॅक चोरले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंगल्याच्या बांधकाम साईटवरून चोरट्यांनी लोखंडी प्रोपजॅक चोरून नेले. ही घटना गोविंदनगर भागात घडली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित हरेकृष्ण सरकार (रा.देवळाली कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. सरकार यांच्या गोविंदनगर येथील नवकार हॉस्पिटल भागात बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. चैतन्य रेसिडन्सी परिसरात सुरू असलेल्या बंगला बांधकाम साईटवरून चोरट्यांनी सुमारे १२ हजार रूपये कितमीचे लोखंडी प्रोप जॅक चोरून नेले. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. अधिक तपास हवालदार बहिरम करीत आहेत.