नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– लग्नाचे आमिष दाखवून एकाने दिव्यांग महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अडीच वर्षाच्या प्रेमप्रकरणानंतरही संशयित लग्नास टाळाटाळ करीत असल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चक्रधर श्रीरामजी अंबडकर (४९ रा.जिजामाता नगर,ना.रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ऑॅक्टोंबर २०२२ पासून दोघांमध्ये प्रेमसंबध जुळले होते. दिव्यांग असल्याचे माहित असूनही संशयिताने लग्नाचे आमिष दाखवित पीडितेस बिटको चौकातील दर्शन लॉज येथे घेवून जात वेळोवेळी बलात्कार केला.
मात्र अडीच वर्ष उलटूनही संशयित लग्न करण्यास टाळाटाळ करीत असल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक आहिरे करीत आहेत.