नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पंचशिलनगर येथील सहकार कॉलनीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दीड लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्या चांदीच्या दागिन्याचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली अशोक तेजाळे (रा.छोटी जनता शाळेजवळ एन.के.कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तेजाळे कुटुंबिय गुरूवारी (दि.२७) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले सुमारे दीड लाख रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. त्यात सोनसाखळी व कानातील कर्णफुलांचा समावेश आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.