नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरधाव दुचाकी पाण्याच्या पाटात कोसळल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात चेहडी पंपीग परिसरात झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुकेश वामन सनांसे (रा.निवारा संकुल,चेहडी पंपीगरोड) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सनांसे रविवारी (दि.२३) नाशिक साखर कारखाना भागात गेले होते. रात्रीच्या वेळी ते दुचाकीवर पाटकॅनोल रोडने आपल्या घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. कारखान्याकडून चेहडी पंपीगच्या दिशने ते भरधाव वेगात प्रवास करीत असतांना दुचाकी पाण्याच्या पाटात कोसळली.
या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. मित्र प्रकाश जाधव यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.