नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरात शिरून एकाने विवाहीतेचा विनयभंग केल्याचा प्रकार गणेशवाडी भागात घडला. महिलेने प्रतिकार करीत संशयिताच्या कानशिलेत लगावली असता त्याने पती पत्नीस पाहून घेण्याची धमकी दिल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजरत्न राजाराम वाहूळे असे संशयिताचे नाव आहे. पीडित विवाहीतेच्या फिर्यादीनुसार गेल्या रविवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. संशयित परिचीत असून त्याचे पीडितेच्या घरी येणे जाणे आहे. रविवारी महिला घरी एकटी असतांना त्याने घरात बेकायदा प्रवेश करीत हे कृत्य केले.
महिला एकटी असल्याची संधी साधत त्याने मला तू खूप आवडते, तुला पाहिजे ते देईल असे म्हणत विवाहीतेचा विनयभंग केला. महिलेने प्रसंगावधान राखत त्याच्या कानशिलेत लगावली असता संशयिताने पती पत्नीस बघून घेण्याची धमकी देत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.