रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बेरोजगारांना ७१ लाखाचा चुना लावणारा तोतया पीए गजाआड…अशी केली फसवणूक

by India Darpan
मार्च 1, 2025 | 11:36 am
in क्राईम डायरी
0
jail1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शासकीय नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडविणा-या ठकबाजास पोलीसांनी एकाला गजाआड केले आहे. मंत्रालयातील तत्कालीन मुख्य सचिव भूषण गगराणी यांचा स्वीय सहायक (पीए) असल्याच्या भूलथापा देत त्याने ही फसवणूक केली. शहर पोलीसांच्या गुंडा विरोधी पथकाने लासलगाव परिसरातील विंचूर फाटा येथे सापळा लावून संशयिताला ताब्यात घेतले. त्याने बेरोजगारांना तब्बल साडे ७१ लाख रूपयांना गंडविल्याचे पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.

पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश धोंडू कदम (४७ रा.हेरंब अपा.मांजरली दिपाली पार्क रोड बदलापूर ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत संकेत शिवाजी कोटकर (रा.नैताळे ता.निफाड) या युवकाने फिर्याद दिली आहे. शहरातील पंचवटी महाविद्यालयात कोटकर शिक्षण घेत असून अन्य विद्यार्थ्यांसह तो भाडेतत्वावरील खोलीत वास्तव्यास आहे. एका मित्राच्या माध्यमातून संशयित कदम हा २०२३ मध्ये कोटकर याच्या संपर्कात आला होता. संशयित कदमने राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव भूषण गगराणी यांचे स्वीय सहायक असल्याची बतावणी केली. अनेक बड्या व्यक्तींशी आपल्या ओळखी आहेत. शासकीय नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत संशयिताने कोटकर यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांकडून ७१ लाख ५० हजार रुपये घेतले. संशयिताने ही रक्कम धनाकर्षाद्वारे घेतली होती. संशयिताने पत्नी संगिता कदम उर्फ संगिता केदारे यांच्या बँक खात्यात या रकमा स्वीकारल्या. सुरुवातीला खातेनिहाय नोकर भरतीनुसार संशयिताने तरूणांना अर्ज भरायला लावले. मात्र कुठेही त्यांचे काम झाले नाही. तीन वर्ष उलटूनही नोकरी मिळत नसल्याने बेरोजगार युवकांनी पैसे परत देण्यासाठी पाठपुरावा केला. तेव्हा संशयिताने टोलवाटोलवी केली. यात ७१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आला.

या गंभीर गुन्ह्यातील संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला सूचित केले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित प्रकाश कदम हा फरार होता. स्वत:च्या घरी न राहता तो कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात फिरत असल्याने त्याची माहिती काढणे अवघड झाले होते. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक कौशल्य वापरून माहिती काढली. संशयित कदम हा लासलगाव भागात येणार असल्याची माहिती मिळाल्यावर गुंडाविरोधी पथकाचे अमलदार विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत व विजय राठोड यांचे पथक तिकडे रवाना झाले. स्थानिकांकडून माहिती घेत विंचूरफाटा येथे सापळा रचून संशयित प्रकाश कदम याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अमलदार विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत, ,राजेश राठोड, सुनिता कवडे यांनी पार पाडली

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

Next Post

आदित्य-एल 1 ने सूर्याच्या प्रभावळीतील शक्तिशाली सौर ज्वाळांचे दृश्य टिपले

Next Post
solar 1DJWC e1740809803717

आदित्य-एल 1 ने सूर्याच्या प्रभावळीतील शक्तिशाली सौर ज्वाळांचे दृश्य टिपले

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011