नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पत्नीस जातीवाचक शिवीगाळ करणा-या पती विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासूला घरी आणल्याने संतप्त जावयाने पत्नीस शिवीगाळ करीत माहेरकडील नातेवाईकांना घरात घेण्यास मज्जाव केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार प्रविण लांडगे (रा.स्वामी समर्थ नगर,आडगाव शिवार) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. २५ वर्षीय पिडीतेने याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारदार पिडीता व संशयित यांचा प्रेमविवाह झाला असून ते एकत्रीत राहत आहेत.
गुरूवारी (दि.२७) पत्नीची आई घरी वास्तव्यास आल्याने लांडगे दांम्पत्यात वाद झाला. यावेळी संशयिताने लग्नानंतर तूझी जात बलली असून माहेरकडील परजातीचे लोक आपल्या घरी बोलवायचे नाही. असा दम देत संशयिताने जीतीवाचक शिवीगाळ करीत पत्नीस मारहाण केली. अधिक तपास सहाय्यक आयुक्त पदमजा बढे करीत आहेत.