नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात अंबडलिंक रोड भागात झाला होता. याप्रकरणी दुचाकीचालकाविरोधात अंबड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार शंकर साळवे (रा.एकता चौक,उत्तमनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत रविद्रबाबू मधुकर आहिरे (रा. गोविंद अपा. महाजननगर) यांनी फिर्याद दिली आहे. आहिरे यांच्या पत्नी शैला रविंद्र आहिरे (५६) या गेल्या बुधवारी (दि.१९) अंबड लिंकरोडवरील उत्तमनगर भागात रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला होता.
अतुल स्विट जवळ भरधाव एमएच १५ एचटी १८४९ या दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात शैला अहिरे या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.