बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जिल्हा रूग्णालयाच्या डॉक्टरकडे दहा लाखांच्या खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

by India Darpan
फेब्रुवारी 26, 2025 | 8:00 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महिला मृत्यू प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत दोघा समाजवेकांसह रूग्णालयातील आजी माजी अधिका-यांनी डॉक्टरकडे दहा लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून सिव्हील मधील राजकारण चव्हाट्यावर आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल खुर्चे, रवी पगारे रूग्णालयाचे माजी डॉ. आनंद पवार व कार्यालयीन अधिक्षक व्ही.डी.पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत जिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिक अशोक भांगरे (वय ३८, रा. कॉलेज रोड) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. भांगरे हे सिव्हिलच्या अतिदक्षता विभागात कार्यरत आहेत. जिल्हा रुग्णालयात ३१ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. दिपाली झोले या गर्भवती महिलेस उपचारार्थ दाखल केल्यावर प्रसूतीनंतर मूत्रपिंड निकामी झाल्याचे समोर आल्याने तिला संदर्भ सेवा रुग्णालयात हलविण्यात आले होते. या ठिकाणी उपचारादरम्यान झोले यांचा मृत्यू झाला.

यानंतर ४ फेब्रुवारी रोजी संशयित खुर्चे व पगारे यांनी झोले यांचे नातलग असल्याचा दावा केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांची भेट घेत झोलेच्या मृत्यूला डॉ. भांगरेसह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा दावा केला. त्यामुळे चौकशी समिती नेमली असताना झोले यांचे नातलग नसतानाही खुर्चेसह इतरांनी संगनमताने डॉ. भांगरे यांच्यावर झोले याच्या मृत्यूचा आरोप करीत दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. वारंवार पैशांची मागणी व जीवे मारण्यासह गुन्हा नोंदवून जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्याची धमकी देण्यात आल्याने त्रस्त डॉ. भांगरे यांनी पोलिसांत धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत ६२ वर्षीय महिला ठार

Next Post

अगस्ति ऋषी मंदिराच्या विकासासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर…मंत्री झिरवाळ यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन

India Darpan

Next Post
zirwal

अगस्ति ऋषी मंदिराच्या विकासासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर…मंत्री झिरवाळ यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011