नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर परिसरातील वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांनी सोमवारी (दि.२४) गळफास लावून घेत आत्महत्या केली. दोन्ही जणांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाब भद्रकाली व म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिरोज अजीज सय्यद (४२ रा.संत कबिरनगर,झोपडपट्टी,कावेरी हॉटेलजवळ द्वारका ) यांनी सोमवारी सकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी शेडच्या अॅगलला ओढणी बाधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ पारू सय्यद यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ. संतोष बोदाडे यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बाविस्कर करीत आहेत.
दुसरी घटना म्हसरूळ येथे घडली. संजय खंडू आहेर (४३ रा.आर्य सोसा.ओमकार बंगल्याजवळ) यांनी रविवारी मध्यरात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. पत्नी संगिता आहेर यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार फुगे करीत आहेत.