नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात वेगवेगळय़ा भागात पार्क केलेल्या सहा दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी आडगाव, सरकारवाडा, गंगापूर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
धात्रकफाटा येथील गौरव शिवाजी बाविस्कर (रा.मथुरा अपा.धात्रकफाटा) यांची एमएच १९ इएल २१३२ ही पल्सर गेल्या बुधवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली.
दुसरी घटना याच परिसरातील संत सावता माळी भागात घडली. प्रतिक संजय बेडसे (रा.साक्री जि.धुळे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बेडसे यांची स्प्लेंडर एमएच १८ क्यु ८९४६ गेल्या रविवारी (दि.१६) संत सावता माळी नगर येथील अग्निशमन दलाच्या ऑॅफिस मागे पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही घटनांबाबत आडगाव पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार राजूळे व गांगुर्डे करीत आहेत.
तिसरी घटना मेळा बसस्थानक परिसरात घडली. उपेन विजयकुमार खरबंदा (रा.अनुप सोसा.जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. खरबंदा शुक्रवारी (दि.२१) मेळा बसस्थानक भागात गेले होते. आवारातील पार्किंग मध्ये लावलेली त्यांची एमएच १५ जीई ७३९९ मोटारसायकल चोरट्यांनी पळवून नेली. चौथी घटना गंगावाडीत घडली. अक्षय सुधाकर साळवे (रा. पांडूरंग कॉलनी,पवारमळा आरटीओ समोर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. साळवे बुधवारी (दि.१९) गंगावाडीत गेले होते. तुळजाभवानी मंदिराजवळ लावलेली त्यांची एमएच १५ जीजे १०३४ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही घटनांबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार लोंढे व बागुल करीत आहेत.
पाचवी घटना सावरकरनगर भागात घडली. राहूल शरद सोनवणे (रा.सुमन अपा.गणेश मंदिराजवळ सावरकरनगर) यांनी फिर्याद दिली आहे. सोनवणे यांची पल्सर एमएच ४१ एडब्ल्यू ७५५६ गेल्या शनिवारी (दि.२२) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यानी चोरून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गवे करीत आहेत. तर गोकुळ रूपचंद चौरे (रा.शिवशक्तीनगर,जेलरोड) यांची एमएच १५ ईआर ०५७५ ही गेल्या शनिवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कु-हाडे करीत आहेत.