नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शेकोटीवर शेकत असतांना तोल जावून पडल्याने गंभीर भाजलेल्या मद्यपीचा मृत्यू झाला. ही घटना देवळाली कॅम्प येथील सिध्दीपंचायम हॉल परिसरात घडली होती. याप्रकरणी दे.कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लंकेश देविदास बंगाली (३२ रा. चंद्रमणी नगर,देवळाली कॅम्प) असे मृत इसमाचे नाव आहे. बंगाली यास दारू पिण्याचे व्यसन होते. शनिवारी (दि.२२) रात्री तो मद्याच्या नशेत सिंध्दी पचायम हॉल परिसरात पेटविलेल्या शेकोटी येथे शेकत असतांना ही घटना घडली. शेकत असतांना अचानक तोल जावून तो शेकोटीत पडला होता.
या घटनेत ८० टक्के भाजल्याने त्यास तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी उपचार सुरू असतांना डॉ. शहाबाज यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार म्हसदे करीत आहेत.