नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रेमप्रकरणात एकाने वेळोवेळी मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेयसीने विवाह करताच संशयिताने अश्लिल व्हिडीओ व्हायरल केल्याने तिचा संसार उध्वस्त झाला असून पीडितेने भद्रकाली पोलीसात धाव घेतली आहे. हा गुन्हा पंचवटी पोलीसांकडे वर्ग करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस दप्तरी बलात्कार, पोस्को आणि आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुने नाशिक भागात राहणा-या विवाहीतेने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडिता अल्पवयीन असल्यापासून तिचे परिचीत संशयिताशी प्रेमप्रकरण होते. २०१६ पासून सुरू झालेल्या या प्रेमप्रकरणात संशयिताने तिला वेगवेगळया ठिकाणी घेवून जात बळजबरीने बलात्कार केला. हा प्रकार गेली नऊ वर्ष सुरू होता.
यानंतर सज्ञान झालेल्या मुलीचा कुटुंबियांनी विवाह लावून दिला. मात्र या रागातून संशयिताने वेळोवेळी झालेल्या भेटीत मुलीचे काढलेले फोटो आणि व्हिडीओ मित्रांमध्ये व विवाहीतेच्या पतीस धाडल्याने पीडितेवर संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.