नाशिक : अल्पवयीन मुलाची सायकल हिसकावून घेत दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार शालिमार परिसरात घडला. मुलाने घरी जावून कुटूबियांकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुश्या व लड्डया अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तेरा वर्षीय मुलगा शनिवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास शालिमार सिग्नल भागातून आपल्या सायकलवर प्रवास करीत असतांना संशयितांनी त्याची वाट अडविली. यावेळी संशयितांनी मुलाच्या ताब्यातील सायकल हिसकावून घेत हे कृत्य केले.
परिसरातील कल्पराज दुकानाच्या पार्किंगमध्ये घेवून जात मुलावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलाने कशीबशी सुटका करून घेत घर गाठून आपल्या कुटुंबियांकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.