नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्त्याने पायी जाणा-या महिलेची वाट अडवित एकाने विनयभंग केल्याचा प्रकार देवळाली कॅम्प भागात घडला. या घटनेत संशयिताच्या नातेवाईकांनी पीडितेस शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिध्दार्थ गेलोथ त्याचा मेहुणा बेद, निता बेद, निखील गेलोथ व त्याची पत्नी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयित व पीडिता एकमेकांचे परिचीत असून मंगळवारी (दि.१८) रात्री हा प्रकार घडला. पीडिता कल्पना गारमेंटस भागातून रस्त्याने पायी जात असतांना संशयितांनी तिची वाट अडवित शिवीगाळ व दमदाटी केली.
यावेळी सिध्दार्थ गेलोथ याने कपडे फाडून महिलेचा विनयभंग केला तर उर्वरित संशयितांनी धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास जमादार म्हसदे करीत आहेत.