नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उड्डाणपूलावर ओमनी कारमधून गोवंश मांस विक्री करणा-या एकाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. या कारवाईत कारसह दोनशे किलो मांस असा सुमारे ९० हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अयाज फय्याज बागवान (४० रा. बागवानपुरा भद्रकाली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मांस विक्रेत्याचे नाव आहे. द्वारका परिसरातील उड्डाणपूलावर कारमधून एक जण गोवंश मांसची विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.२१) पहो पथकाने धाव घेतली असता संशयित विना नंबर ओमनी कारमध्ये बसून गोवंश मांस विक्री करतांना मिळून आला.
घटनास्थळावरून पोलीसांनी कारसह सहा गोणीमध्ये भरलेले सुमारे २०० किलो वजनाचे मास जप्त केले असून याप्रकरणी अंमलदार सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार साळुंखे करीत आहेत.