नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ३५ वर्षीय अनोळखी तरूण ठार झाला. हा अपघात तपोवन रोडवरील समर्थ टी पॉईंट भागात झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.१९) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. काठे गल्ली कडून तपोवनरोडने पायी जाणा-या अनोळखी तरूणास चस्का मस्का हॉटेल समोर अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात पोटास व हातापायास गंभीर दुखापत झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानतर चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून याबाबत हवालदार दिपक रेहरे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गवांदे करीत आहेत.