नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सरकारी नोकरीचे आमिष दाखवून काका पुतण्याने बेरोजगारास नऊ लाखास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. काकाने पैसे परत करण्याची हमी घेवूनही रक्कम अदा न केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिक मदन पाठक व प्रशांत मधूसुदन पाठ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित काका पुतण्याचे नाव आहे. याबाबत सतिश मानिक ठाकरे (रा.कमलनगर,हिरावाडी) या बेरोजगाराने फिर्याद दिली आहे. सन.२०२३ मध्ये तक्रारदार ठाकरे आणि पाठक काकापुतण्यात भेट झाली होती. यावेळी प्रतिक ठाकरे याने सरकारी नोकरीस लावून देण्याची ग्वाही दिल्याने ठाकरे यांनी नऊ लाख रूपयांची रोकड संशयिताच्या स्वाधिन केली होती.
हा प्रकार जत्रा हॉटेल परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आडगाव शाखा परिसरात घडला होता. दीड वर्ष उलटूनही कुठलीही नोकरी न लागल्याने ठाकरे याने पैश्यांचा तगादा लावला असता प्रतिकचा काका प्रशांत पाठक यांनी पैसे परत मिळवून देण्याची हमी दिली होती. मात्र दोघांकडून टोलवाटोलवी होत असल्याने ठाकरे या बेरोजगाराने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास जमादार बस्ते करीत आहेत.