नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बसमध्ये चढतांना महिलेच्या पर्स मधील दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना मेळा बसस्थानक आवारात घडली. या घटनेत दीड लाखांचे अलंकार भामट्यांनी लांबविले असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनी नानाजी आहेर (रा.तारवालानगर,पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आहेर या गोल्ड लोन करण्यासाठी सटाणा येथे जाणार होत्या. मंगळवारी (दि.१८) सकाळी त्या मेळा बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली. नाशिक सटाणा या बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी हात की सफाई केली.
अज्ञात भामट्यांनी आहेर यांच्या पर्समधील पेंडल असलेली सोन्याची पोत आणि बांगड्या असा सुमारे १ लाख ४५ हजाराचे अलंकार हातोहात लांबविले. चोरीचा हा प्रकार आहेर या बसमध्ये बसल्या असता उघडकीस आला. अधिक तपास साबळे करीत आहेत.