ं
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात घरफोडीची मालिका सुरुच असून आता मखमलाबादरोड आणि टाकळीरोड भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणे तीन लाखाच्या ऐवज लपंसा केले. त्यात एका भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश असून, याप्रकरणी पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार व राहूल बळीराम तुपे (रा.उदय कॉलनी,मखमलाबाद रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तुपे कुटूंबिय गेल्या गुरूवारी (दि.१९) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी तुपे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे एक लाख ८५ हजार ५०० रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कुलकर्णी करीत आहेत.
दुसरी घटना द्वारका परिसरातील टाकळीरोड भागात घडली. दिपक विठ्ठल खलाणे (रा.शितल को.सोसा.) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. खलाणे कुटुंबिय सोमवारी (दि.२३) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून हॉलमधील टीव्ही शोकेश मधील सामान अस्ताव्यस्त फेकून बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचादीचे दागिणे असा सुमारे ९० हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उफनिरीक्षक गवांदे करीत आहेत.