नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जेलरोड येथील कॅनोलरोड भागात गरम चहा अंगावर सांडल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. गेली बारा दिवस सदर मुलगी खासगी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ओरान मुसा शेख (१ वर्ष चार महिने रा.कॅनलरोड दत्तमंदिर,जेलरोड) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. गेल्या गुरूवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. घरात खेळत असतांना ओरान शेख हिच्या अंगावर उकळता चहा सांडला होता. या घटनेत तिच्या छातीस व पोटाचा भाग भाजल्याने वडिल मुसा शेख यांनी तातडीने तिडके कॉलनीतील नेल्सन मेमोरियल चिर्ल्डन हॉस्पिटल येथे दाखल केले होते.
गेली बारा दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती. अखेर मंगळवारी (दि.१८) उपचार सुरू असतांना डॉ. मंदार वैद्य यांनी तिला तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.