नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- माझी नाही तर कुणाची नाही अशी धमकी देत एकतर्फी प्रेमातून एकाने तरूणीचा ठरलेला विवाह मोडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेश दत्तात्रेय जगताप (रा.कपालेश्वरनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
या घटनेबाबत कपालेश्वरनगर भागात राहणा-या पीडितेने फिर्याद दिली आहे. संशयित २०१८ पासून युवतीचा पाठलाग करीत आहे. वेळोवेळी गाठून त्याने प्रेमाची मागणी केली. मात्र मुलीने त्यास नकार दिल्याने शिवीगाळ करीत त्याने माझी नाही तर कुणाचीही होवू देणार नाही. तसेच बदनामीचीही धमकी दिली होती.
यानंतर युवतीचा विवाह निश्चीत झाल्याचे समजताच त्याने वराचा शोध घेवून त्यास खोटी माहिती देवून तरूणीचा विवाह मोडण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास उपनिरीक्षक मयुर निकम करीत आहेत.