नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बांधकाम साईटवरील चौथ्या मजल्यावरून पडलेल्या मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर मजूर गेली पंधरा दिवस खासगी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जगनारायण चौधरी (६०) असे मृत मजूराचे नाव आहे.
चौधरी गेल्या २ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास गंगापूरररोडवरील सिरीन मिडोज भागातील सेटींग व्हिला या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर काम करीत असतांना ही घटना घडली होती. अचानक तोल गेल्याने ते जमिनीवर कोसळले होते. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने मुलगा इंद्रजीत चौधरी यांनी त्यास दिंडोरीरोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरातील जिवक हॉस्पिटल येथे दाखल केले होते.
रविवारी (दि.१६) उपचार सुरू असतांना डॉ.हितेश पाटील यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार हिंडे करीत आहेत.
२० वर्षीय युवकाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चुंचाळे शिवारात राहणा-या २० वर्षीय युवकाने रविवारी (दि.१६) गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुमीत वसंत पाईकराव (रा.घरकुल चुंचाळे शिवार) असे मृत युवकाचे नाव आहे. सुमीत पाईकराव याने रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच काका मिलींद बनकर यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत.