नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रेडिट कार्डचा बेकायदा वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. बंद करण्यासाठी दिलेल्या क्रेडिट कार्ड बॅक कर्मचा-याने परस्पर वापरून तब्बल दोन लाख रूपयांची फसवणुक करण्यात आली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलेश खटकाळे,विकास जगताप,कुसूम खटकाळे व उमेश खटकाळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अविनाश तुकाराम येवले (रा.कामटवाडा) यांनी फिर्याद दिली आहे. येवले रियल इस्टेटचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे आरबीएल बजाज फायनान्स कंपनीचे क्रेडिट कार्ड होते. डिसेंबर २०२३ मध्ये कार्ड बंद करण्यासाठी ते बजाज फायनान्सच्या कॉलेजरोड येथील कार्यालयात गेले होते. या ठिकाणी कमलेश खटकाळे या संशयिताने कार्ड आपल्या ताब्यात घेवून कार्ड बंद करण्याची ग्वाही दिली होती . यानंतर संशयिताने कार्डचा परस्पर वापर केल्याचे समोर आले आहे.
संशयिताने सिध्दी विनायक पेट्रोल पंप येथे स्वाब मारून दोन लाख ३३६ रूपयांची रक्कम आई कुसूम खटकाळे व भाऊ उमेश खकाळे यांच्या खात्यावर ट्रान्सपर केले. ही बाब निदर्शनास येताच येवले यांनी पुन्हा बजाजच्या कार्यालयात धाव घेत व्यवस्थापक जगताप यांची भेट घेतले असता त्यांनीही टोलवा टोलवी करीत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील पवार करीत आहेत.