नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मखमलबाद शिवारातील मानकर मळा भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा सहा लाख रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनी स्वप्निल पडोळ (रा. श्रीकृष्णनगर,मानकरमळा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पडोळ कुटुंबिय १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६ लाख ३९ हदार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.
…….
कारची काच फोडून पर्स चोरली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी पर्स चोरून नेली. या पर्स मध्ये सुमारे १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन भाऊसाहेब शिंदे (रा.सिध्देश्वरनगर,जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिंदे रविवारी (दि.१६) कुटुंबियास सोबत घेवून तपोवनात गेले होते. स्वामी नारायण मंदिर परिसरात त्यांनी आपली कार पार्क केली असता ही घटना घडली. शिंदे कुटुंबिय परिसरांतील मंदिरामध्ये देवदर्शन घेत असतांना अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून पाठीमागील आसनावर पडलेली पर्स चोरून नेली. पर्स मध्ये १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल होता. अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.